||नव्या नवरीच मन ||
||नव्या नवरीच मन ||
नव्या नवरीच मन कसं, वाऱ्यावरती फिरत|
जस ओल्या चिंब पावसा, मन भिजत||
जमल लगीन मुलीच मन हे, कावर बावर|
जस शेळ्या मेंढ्यांच, कोकरू रानात वावर||
काय विचार मुलीच्या, मनात मळभ दाटलं|
जणू नभात घन हे, आकाश अंगणी वाटलं||
नवरा उधळीत येईल कसा, मातीचा गुलाल|
जस भिजल्या केसात अंगी रोमांच फुललं||
माय-बापाची माया सरुनी, माहेर भुलल|
जणू नवरीच्या मनात, सासर आता फुलल||
माय-बापाच्या डोळा पाणी, मनात काहूर|
जाता नांदाया मुलगी, फुटे हो मायेचा पाझर||
झाल लगीन मुलीचा, हृदय आली भरून|
जस आभाळ आलय, पाऊस अंगणी घेवून||