वेळ ( अभंग रचना )
वेळ ( अभंग रचना )
1 min
403
वेळ
( अभंग रचना )
थांबत ती नाही | वेळ कोणासाठी I
घालतसे पाठी | सर्वकाही ॥ १ ॥
प्रत्येक तो क्षण I आनंदे जगावा |
उजाळा मिळावा I गतकाळा ॥ २ ॥
नको तो रुसवा I नको तो अबोला I
व्दार सारे खोला | मनातील ॥ ३ ॥
हळुवार जपा | नात्यांचा ओलावा |
जिव्हाळा वाढावा I आपसात ॥ ४ ॥
नको पश्चाताप I वेळ ती सरता |
राही हात रिता I आपलाच ॥ ५ ॥