STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

1  

Abasaheb Mhaske

Others

हल्ली ... माणसं माणसंसारखी ..

हल्ली ... माणसं माणसंसारखी ..

1 min
410


का कुणास ठाऊक ? हल्ली ...

माणसं माणसंसारखी वागत नाही 

कितीही जीव लावला तरी विंचवासारखं 

डंख मारण्यास विसरत नाही ... 

मनापासून आपलं मानलं तरी

हात दाखवल्याशिवाय रहात नाही 

कुत्र्यागत तंगड वर केल्याशिवाय 

त्यांना चैन काही पडत नाही ...

ज्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकावी 

तेच केसांनी गळा कापल्याशिवाय रहात नाही 

मोठ्या मनानं माफ करावं तर ते षंढ समजतात 

उगाचच तेच मढ पुन्हा नव्याने उकरतात ...

शिकले सवरलेले लोक अडान्यागत वागतात 

बुद्धी गहाण ठेवून नाहक बुवाबाजांना पोसतात  

माणसांना लाथाडून निर्जीव दगडात देव शोधतात 

माणसातलं माणूसपण सोयीस्कर विसरतात ...

आरे ! मनाच्या गाभाऱ्यात माणूसपण जपून ठेवा 

रंजल्या गांजल्यात देव गड्या संतमंडळी सांगून गेली 

स्वर्ग इथे ,नरक इथे ,कसं जगावं तुझ्याच हाती ...

 कण्हत - कण्हत की गाणं म्हणत...


Rate this content
Log in