आभास ( काव्यांजली )
आभास ( काव्यांजली )
1 min
7.0K
मन अशांत
धडधड होते उरात
कोण दारात ?
आभास....१
गर्दित एकटा
जीवाचा आकांत
वाटे परत
आभास.....२
ठोके बाराचे
ओलांडले त्या रात्रीने
कुत्र्याचे भुंकणे
आभास.....३
चांदण रात
त्यात सावल्यांचा भास
कोंडला श्वास
आभास......४
लागलीया धाप
कोण करी पाठलाग ?
कोणाचा मग ?
आभास.....५
रेखाटले चित्र
उदास वाटे रंग
कोणाचा संग ?
आभास......६
मृत्यू पाहता
स्वप्नात तो ओरडा
घसा कोरडा
आभास......७