आठवण ( अभंग रचना )
आठवण ( अभंग रचना )
1 min
7K
असे कधी कडू|असे कधी गोड॥
नाही त्याला तोड | आठवण ॥१॥
गोष्टी बिंबतात | मनावर अशा ॥
गोंदण या जशा | चिरकाल ॥ २॥
हसवतात त्या | रडवतात ही ॥
आरसाच पाही | एकांतात ॥३॥
आठवण ठेवा । जपून ठेवावा ॥
पुढे मग दयावा | शब्दरूपे ॥४॥
आठवणी पहा | विसरत नाही ॥
त्या सोडत नाही ॥ साथ कधी ॥५॥