सावली
सावली
1 min
241
सावली
सावली घराची
मिळावी ती सर्वांना
होवो मनोकामना
पूर्ण ॥१॥
घरात सावली
आई आणि बाप
नाती जप
असे ॥२॥
थोरा मोठयांची
सावली आशीर्वाद
तेथे वादविवाद
नसे ॥३॥
आदर्श दैवत
राहो सावली त्यांची
जीवन जगण्याची
छान ॥४॥
होवू चला
आता आपण सावली
कोणाची माऊली
बघ ॥५॥