विभक्त ( अभंग रचना )
विभक्त ( अभंग रचना )
1 min
153
आई बाबा दोघे | लेकरास हवे I
तरी दुभंगावे | घर असे ॥ १ ॥
मुल बाळ नाही | तोवर ठरवा |
घटस्फोट घ्यावा | आनंदाने ॥ २ ॥
मुलाच्या हक्कास I लढाई कोर्टात I
मुल संभ्रमात | पाहतसे ॥ ३ ॥
दारास त्या हवे | कुलूुप एकच |
चावी ही एकच I नेहमीच ॥ ४ ॥
दोन त्या हातांनी | घर सांभाळावे |
विभक्त न व्हावे | मने कधी ॥ ५ ॥