वाचनाची आवड ( काव्यांजली )
वाचनाची आवड ( काव्यांजली )
1 min
1.4K
लहानपणी होती
किती वाचनाची आवड
नाही सवड
अता
स्मार्टफोन हाती
सोशल मिडीयावर जाती
वेळ घालवती
सारा
लाईक कमेंट
याचीच सारी चिंता
बॅटरी संपता
त्रागा
मन लागेना
नेट ते जाता
वारंवार पाहता
स्क्रिन
पुस्तक मित्र
खरे ते माना
विकत घ्याना
एक