आई ( अभंग रचना )
आई ( अभंग रचना )
1 min
7.1K
आईपण असे I अंत पाहणारे ॥
बाळ ते हसरे I बिलगते ॥१॥
पहिलाच पान्हा | अमृत बाळाला ॥
लावता छातीला | प्रसवून ॥२॥
गुरू तो पहिला I आईच असते |
बोट ती धरते | चालताना ॥३॥
आई भावविश्व | प्रत्येक घरात II
लेकरू मिठीत I आनंदते ॥४॥
आई आशिर्वाद | लेकरास देते II
कष्ट त्याचे घेते I पदरात ॥ ५ ॥
आईची ती सेवा I करी मनोभावे ॥
सार्थक ते व्हावे I जीवनाचे ॥६॥