Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

शतकोटी प्रणाम !

शतकोटी प्रणाम !

1 min
7.2K


दोस्ता , तुला आठवण येत नाही का रे...

आनंदानं , हर्षोल्हासन घर उजळन 

कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणं 

जीवन मरणाची रक्ताची होळी खेळताना ....

दोस्ता , तुला आठवण येत नाही का रे... 

वाट पाहणाऱ्या बायकोची ,चिमुकल्या सानुलीची 

थकलेल्या आईची , गोठ्यात हंबरणाऱ्या गायीची 

कष्टणा-या बापाची अन गावाकडच्या मित्रांची ?

दोस्ता , कुणी कदर करील का रे ...

तुझ्या रात्रंदिनी ऊन, वारा पावसात सीमेवर लढण्याची  

दुष्मनाशी निकराने झुंजताना , शहीद होण्याची ... 

देशासाठी रक्त सांडणे ,तुझ्या त्याग , समर्पणाची 

दोस्ता , तुलाही वाटत असेल ना रे...

दमून भागून घरी यावं , बायकोनं स्मितहास्यानं स्वागत करावं 

चिमुरडीने बोबडे बोलत पपा म्हणत आलिंगन द्यावं  

दमलास कारे लेकरा... आईन काळजीनं पुन्हा म्हणावं  

दोस्ता , काहीही म्हण तू खरंच ग्रेटच रे...

मातृभूमीच्या रक्षणार्थ हसत हसत मरण स्वीकारतो 

तुझ्या रोमारोमातून फक्त जय हिंदचाच नारा ऐकू येतो 

तुझ्या कर्तुत्वाला , देशभक्तीला प्रणाम ! शतकोटी प्रणाम !


Rate this content
Log in