विश्वचषक ( अभंग रचना )
विश्वचषक ( अभंग रचना )
1 min
253
क्रिकेटच्या देशी I रंगणार मेळा |
संघ झाले गोळा | दहा पहा ॥ १ ॥
क्रिकेट पंढरी | इंग्लंड म्हणती |
हजेरी लावती | जिंकण्यास ॥ २ ॥
फलंदाजी पहा | गोलंदाजी बघा |
घराकडे निघा | लगबग ॥ ३ ॥
आपलाच संघ I जिंकावा वाटतो I
झेंडा फडकतो | अभिमाने ॥ ४ ॥
देशाच्या शुभेच्छा | पाठीशी अनेक |
तो विश्वचषक | जिंकण्यास ॥ ५ ॥