विस वर्षांपासून बंद दरवाजा मागे काय होत
विस वर्षांपासून बंद दरवाजा मागे काय होत
समृद्धी नावाची एक मुलगी होती तिच्या घरात एक दरवाजा होता जो गेल्या विस वर्षांपासून बंद होता
लहानपणापासून तिने आईला त्या दरवाजाजवळ जाताना पाहिले होते पण दरवेळी आई फक्त दाराकडे पाहायची आणि शांतपणे निघून जायची.
एक दिवस समृद्धी ने विचारल आई या दरवाज्यामागे काय आहे? आईच्या चेहऱ्यावर भिती दिसली.ति फक्त एवढेच म्हणाली त्या दरवाजाला कधी उघडू नकोस.
पण जशी माणसाला बंद गोष्टीबद्दल जास्त उत्सुकता असते तशी समृद्धी ची उत्सुकता वाढत गेली एक रात्री घरातील सगळेजण झोपले होते.अचानक खणखण खणखण असा आवाज आला.
तो आवाज त्या बंद दरवाजा मागून येत होता.ति हळुहळू दरवाजाजवळ गेली.दरवाज्याघालुन एक कागद बाहेर आला होता त्यावर लिहिल होत दार उघडण्यापूर्वी मागे वळून पहा.
समृद्धी घाबरली पण तिने मागे वळून पाहिले तर तिची आई तिथे उभी होती आईच्या हातात किल्ली होती.
आईन समृद्धी च्या हातात किल्ली ठेवली आणि म्हणाली आज तू हे रहस्य जाणून घेण्याइतकी मोठी झाली आहेस दोघींनी दरवाजा उघडला आत अंधार होता आईने लाईट लावला आणि समृद्धी थक्क झाली.
खोलीच्या भिंतीवर समृद्धीची चित्र चित्र लावलेली होती
तिने लहानपणी काढलेली फाटलेली अपूर्ण राहिलेले कोणालाही न दाखवलेली चित्र .
आई हसली आणि म्हणाली तू प्रत्येक वेळी तुझी अपूर्ण चित्र फेकून द्यायची पण मला माहित होते.एक दिवस तुला याच चित्रांमधून तुझा प्रवास दिसेल.
समृद्धीने विचारल मग हा दरवाजा बंद का ठेवला होता
आई म्हणाली कारण काही रहस्य लपवण्यासाठी नसतात तर ती योग्य वेळीच वाट पाहत असतात.
त्या रात्री समृद्धी ला समजलं आपल्या आयुष्यातील काही दार बंद असतात कारण त्यांचे मागे भिती नसते तर आपल्या स्वतःच्या स्वप्नांची वाट पाहणारी एक दुनिया असते.
