Untitled
Untitled
"तुझं माझं आयुष्य”
मला वाटतं, आव्हानं स्वीकारून जगत राहणं म्हणजे आयुष्य.
मला वाटतं, जमत नसलेल्या गोष्टी वारंवार करत राहणं म्हणजे आयुष्य.
मला वाटतं, एखाद्याचा आपल्याविषयी असलेला निर्णय उलटवण्यापेक्षा त्याला केलेलं प्रोत्साहन म्हणजे आयुष्य.
एखाद्या दिवशी स्वतःला वाटतं तसं जगून घेणं म्हणजे आयुष्य.
आपण आपला गुंता सोडवण्यासाठी दुसऱ्याला आपल्यात गुंतवून ठेवणं हे चुकीचं समजत जगणं म्हणजे आयुष्य.
दुसऱ्याशी वाद न घालता स्वतःशीच सतत वाद घालत राहणं म्हणजे आयुष्य.
समाजात जगताना स्वतःची इज्जत स्वतः करणं म्हणजे आयुष्य.
आपली इज्जत करण्याचा अधिकार दुसऱ्या कुणालाही न देणं म्हणजे आयुष्य.
आलेली वाईट वेळ स्वतःला सिद्ध न करता टाळणं म्हणजे आयुष्य.
आणि चांगल्या गोष्टीला अनुसरून वाईट गोष्टीचा परिणाम भोगत जगणं म्हणजे आयुष्य.
अशीच एक ओढ स्वतःच्या मनात ठेवून वावरणं म्हणजे आयुष्य.
सतत दोन चेहरे घेऊन फिरणं म्हणजे आयुष्य.
दोन चेहरे घेऊन फिरणाऱ्या लोकांना आनंद शोधण्याचा अधिकार नसतो — हेच आयुष्य.
आणि एवढ्यावर न थांबता, गेलेल्या वेळेला दोष देत जगणं म्हणजे आयुष्य.
एक दिवस अख्ख्या आयुष्याची इमारत उभी करून, सगळं जग थांबल्याचं दुःख मनात ठेवून शेवटचा निरोप घेणं म्हणजे आयुष्य.
म्हणूनच, स्वत:चा निर्णय स्वतः घ्या आणि घाई करू नका.
वेळ निघून जाण्याचं दुःख मनात ठेवून जगण्यापेक्षा, आयुष्याचे काही क्षण आहेत ते भरभरून जगा.
आणि म्हणून म्हणतो —
हे असंच असतं आयुष्य…
हे असंच असतं आयुष्य...................🥺
