STORYMIRROR

Mrs. Ranjan Deshpande

Comedy

2  

Mrs. Ranjan Deshpande

Comedy

एक उनाड दिवस!

एक उनाड दिवस!

3 mins
88

काल दिवसभर किती पाऊस झाला! रात्रीही अधूनमधून येतच होता. त्यामुळे सकाळी हवेत गारठा होता. पण एकूण खूप छान वाटत होतं. वाटलं, इतक्या सुंदर वातावरणात आपण घरात बसून काय करतोय! जरासं चाकोरीच्या बाहेर जाऊन आजचा दिवस साजरा करायला काय हरकत आहे. नाहीतरी हे ऑफिसला, मुलं शाळेत गेलीच आहेत. आपण एकटे घरात बसण्यापेक्षा जाऊ या कुठेतरी.

मैत्रिणीला फोन केला, "येतेस का भटकायला पावसात?" लगेच होकार आला. तीही पाऊसवेडी ना! मग काय, पडलो घराबाहेर कुठलाही प्लॅन न करता!


पाऊस पडत नव्हता तेवढा आता, पण पडावा वाटत होतं. विनवलं त्याला,

*"बरसो रे मेघा, मेघा, बरसो रे मेघा मेघा, बरसो!"*


पिरंगुट घाटात फिरायला जाऊ या म्हटलं, गेलो. डोंगरातून छोटे छोटे धबधबे वाहत होते. सगळीकडे हिरवाई पसरली होती. रंग एकच हिरवा, पण छटा किती असाव्यात त्याच्या!

*"हरिभरी वसुंधरा पे निला निला ये गगन!*

*के जीसपे बादलोकी पालकी उडा रहा पवन!*

*ये कौन चित्रकार है!"*

असा धबधब्यातून आनंद ओसंडून वाहत होता. आजूबाजूची हिरवाई पिऊन घेतली आणि निघालो परत. हायवेवरून थोडं चालत जायचं ठरवलं. मस्त दोघी हातात हात घालून फिरत फिरत जात होतो. पाऊसही मस्त भुरभुरत होता.

*"इस बार सावन बहका हुआ है!*

*इस बार मौसम बदला हुआ है!*

*जाने पी के चली क्या पवन!*

*सुलग सुलग जाये मन,*

*भिगे आज इस मौसम में,*

*लगी कैसी ये अगन!"*


आमच्या पुढेच एक जोडपं एका छत्रीतून चालले होते. थोडे भिजत भिजत, बोलत बोलत जात होते. बिचारे! आम्ही त्यांना चिडवलं,

*"कहो की अपनी प्रीत का गीत ना बदलेगा कभी*

*तुम भी कहो इस राह का मित ना बदलेगा कभी"*


आता पावसाचा जोर वाढला होता. आणि आमच्यातला खट्याळपणाही! एका झाडाखाली एक मुलगी पाऊस थांबण्याची वाट बघत थांबली होती. थोडीशी भिजतही होती. तिला पाहून म्हटलं,

*"दिल ही दिल में चली जाती है,*

*बिघडी बिघडी चली आती है,*

*धुंदलाती हुई बलखाती हुई,*

*सावन की सुनी रात में!"*


फिरत फिरत आम्ही मस्त गरम गरम पिठलं भाकरी मिळते अश्या ठिकाणी जेवायला थांबलो. जेवताना नवऱ्याची आठवण झाली. तो बिचारा काम करतोय ऑफिसमध्ये आमच्या चैनी भागवण्यासाठी! पैसे मिळवायच्या मागे लागलाय! मग काय, आम्ही आपले सध्या आमच्या मैत्रिणीबरोबर...

*"हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दुरी,*

*मुझे पलपल ये तडपाये, तेरी दो टकियाकी नौकरीमें मेरा लाखोंका सावन जाये!"*


मस्त गरमागरम जेवण झाल्यावर गेलो खडकवासल्याच्या धरणावर! धरण गच्च भरलंय की हो! खडकवासला चौपाटीवर बसून पाणी पाहताना किती सुंदर वाटत होतं! काय वेगळं असतं हो गिरगाव चौपाटीवर यापेक्षा! मस्त पळत सुटलो आम्ही!

*"आज रपट जाये तो हमे ना उठइयो,*

*आज फिसल जाये तो हमे ना उठइयो!"*


थोड्याच अंतरावर लहान लहान मुलं पावसात नाचत, गाणी म्हणत होती.

*"चक धूम धूम, चक धूम धूम,*

*बादल झुके झुकेसे है, रस्ते रूके रूकेसे है!*

*क्या तेरी मर्जी है मेघा, घर हमको जाने ना देगा!"*

आम्हीपण त्या मुलांच्यात लहान होऊन खूप नाचलो. भरपूर धमाल आली, खूप भिजलो. चहाची आठवण आली. पावसात भिजलेल्या त्याच ओलेत्या अवस्थेत गरमागरम चहा मिळाला तर यापेक्षा मोठं सुख नाही! सोबत गरमागरम कांदाभजी... सोने पे सुहागा!


चला आता घरी, म्हणून मैत्रिणींचा निरोप घ्यायची वेळ आली. थांब थोडं, थांब ना थोडं म्हणता म्हणता तासभर असाच गेला.

*"बरखा रानी, जरा जमके बरसो,*

*के मेरा दिलवर जा ना पाये झुमकर बरसो"*


घरी आले तरी पाऊस चालूच होता अजून. मला बघताच नवऱ्याची, मुलांची कांदाभजीची फर्माईश आली. अगदी हौसेने पुरी केली. दुपारी मैत्रिणीबरोबर आणि आता घरच्यांबरोबर. कंपनी बदलली की एन्जॉयमेंट पण वेगळीच अनुभवायला मिळते नाही!

माझ्या चेहऱ्यावरची खुशी पाहून सगळ्यांना मजा वाटत होती! टीव्हीवर गाणं लागलं होतं,

*"ये मौसम का जादू है मितवा,*

*नहीं दिलपे काबू है मितवा!"*


सारा दिवस उनाडक्या करून कसा संपला कळलंच नाही! झोपताना आज नवराही रंगात आला. म्हणू लागला,

*"जलता है जिया मेरा भिगी भिगी रात में, आ जा गोरी चोरी चोरी अब तो रहा नहीं जय रे..."*


अशा रीतीने चाकोरीबाहेर जाऊन अचानकपणे एक उनाड दिवस साजरा केला आम्ही. किती लहान झालो होतो आम्ही! आता हा आनंद, समाधान, मिळालेली ऊर्जा खूप दिवस पुरून उरेल!


तुम्हीही बघा एकदा अनुभवून असाच एखादा उनाड दिवस! आणि एकदम ताजेतवाने झालात की मला सांगायला मात्र विसरू नका!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy