Adv. Siddheshwar Ashok Kashid

Tragedy

4.4  

Adv. Siddheshwar Ashok Kashid

Tragedy

बावळट की प्रामाणिक?

बावळट की प्रामाणिक?

1 min
320


२२ फेब्रुवारी रोजी पुणे विद्यापीठ मध्ये जात होतो गुगल मॅप लावून जात असताना चुकून मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे समोरून एक ताई स्कुटीवरून जवळ आली, त्याकडे लक्ष नव्हते ती म्हणाली बावळट...


माझ्या मनात विचार आला सर्व मुली अशाच असतात का? नंतर विद्यापीठामध्ये एक मुलगी भेटली तिचा एक्झाम फॉर्मबद्दल प्रॉब्लेम होता व माझा नवीन विषयाबद्दल... मी एका दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाऊन माझे काम संपवून पायऱ्या उतरत होतो तर ती स्कुटी घेऊन आली व म्हणाली बस मागे, मी ग्रामीण भागातील असल्यामुळे थोडा संकोचलो आणि बसलो. तिने मला सांगितले तू अतिशय प्रामाणिक आहेस, असं वागून चालणार नाही व मला माझ्या रूमपर्यंत सोडले.

सकाळी विचार केला होता सर्व मुली अशाच असतात का आणि आता ही मुलगी मला प्रामाणिक म्हणते मग मी कोड्यात पडलो मी बावळट की प्रामाणिक?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy