Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

यशोधरा

यशोधरा

1 min
691


राजकन्या यशोधरा

झाली पत्नी सिध्दार्थाची

वय वर्ष पहा सोळा

जोडी शोभे घराण्याची.....१


नव दाम्पत्य संसारी

वेल अशी बहरली

पुत्र राहुल जन्मास

बाल पाऊले चालली....२


युध्द नको कोलीयाचे

बोल होते सिध्दार्थाचे

मग प्रवज्जा शासन

ठाम झाले मत त्यांचे...३


पत्नी यशोधरास बोले

उभी पाठीशी राहीले

बाळ लहान नसते

आज सोबत असते आले...४


नका करू काळजी ती

करी देखभाल सारी

धैर्यवान, शौर्यवान

खरी महान ती नारी....५


सारे कर्तव्य पूर्ण ते

तरी हसत मुखी ती

घेते मग प्रवज्जाही

अशी सहचारणी ती....६


भार्या यशोधरा लाभे

भाग्य थोर सिध्दार्थाचे

धन्य समजू लागले

सार्थक झाले जीवनाचे....७


Rate this content
Log in