STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

योगीराज श्रीकृष्ण

योगीराज श्रीकृष्ण

1 min
47


हे योगीराज धर्म धुरुंदर

श्री कृष्णा नमन तुझे

सर्वजनांसी आधार तू

हे मुरलीमनोहर नमन तुझे


शिशुपालाच्या पापांचा भरला घडा

यमसदनी त्याला तू धाडला

कंसाचा वध जन रक्षणासाठी केला

हे जगप्रतिपाळा नमन तुझे 


द्रौपदीचे शील रक्षावया

हे केशवा पुरुवलेस तू वस्त्र

धावत आलासी द्वारकाधीशा

हे हृदयसता नारायणा नमन तुझे


कुरुक्षेत्री तू बनूनी सारथी

अर्जुनास तू विश्वरूप दाविसी

गीतामृताचे ज्ञानबोध देसी 

हे विश्वात्मका नमन तुझे


कलियुगीया माजला अधर्म

चाले इथे विषय वासनेचा बाजार

अवतार घे आता हे कृष्ण मनोहर

हे योगेश्वर हरी नमन तुझे


Rate this content
Log in