X निष्पाप प्रित
X निष्पाप प्रित
1 min
27.1K
हृदययतील स्पंदनात
तूच तू आहेस का?
जात नाही काही केेल्या
स्मृती अजूनही जागृृत का?
कल्पना साकार व्हावी
ही मनाची आस का?
तू असतेस सोबतीला
रोज होई भास का?
रंगवितो रोज स्वप्ने
रा़त्रीची ही जाग का?
प्रित होती निष्पाप माझी
हाच माझा दोष का?
सांग अजूनही मनामधे
माझ्यासाठी रोष का?
