Prashant Kadam

Others


5.0  

Prashant Kadam

Others


वसंत

वसंत

1 min 356 1 min 356

वसंत ऋतू सूरू जाहला

वाढली पक्षांची किलबिल 

फुलांभोवती दिसू लागली 

फुल पाखरांची रेलचेल


प्रातःकाली आकाश उघडे

धरती वर दवबिंदूंचे जल

सूर्याचा काही नसे भरोसा

कधि तळपेल कधी लपेल


हरीत पर्णांनी लपून दर्शती

तलाव कसे निर्जल

अचानक त्यात फुलती

लाल कमल पुष्प कोमल 


दुःख वेदनांवर निसर्गाने

जणू पांघरूणच घातलं

धरणी वर सुख शांतीचे

छान नव चैतन्य आणलं 


वसंतातला बहर पिकांचा

शेतं धरती वर डोलतील

कष्टांचे असे फळ पाहता

बळीराजे आनंदी होतील


निसर्गाचा असा रम्य नजारा 

दिसे वसंत ऋतुत केवळ

म्हणूनच तर बहाल त्यासी

राजस्व सहा ऋतूंमधील !


Rate this content
Log in