Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sonam Thakur

Inspirational Others

3  

Sonam Thakur

Inspirational Others

वृक्ष संवर्धन

वृक्ष संवर्धन

1 min
13.3K


लहानपणी वाचले होते

वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे

आता मात्र मनास पटते

महत्त्व त्याचे खरे


वृक्ष म्हणजे पशु-पक्ष्यांचा अधिवास

थकलेल्या जीवांना मिळे त्याची सावली खास

जमे गप्पांचा फड याच वृक्षाखाली

वड पुजिती इथेच सौभाग्यवती


हा नसे फक्त वृक्ष

हा तर थोर कल्पवृक्ष

याचा प्रत्येक भाग असे उपयोगी

आयुर्वेदही सांगती वृक्षाची महती


फळझाडांची असे गोष्टच निराळी

भोवती जमती त्याच्या लहान थोर मंडळी

फुलझाडांचे महत्त्व वेगळे 

त्यांच्या फुलांनी सजती देऊळ आणि लग्न सोहळे


वृक्ष नसतील तर होईल पृथ्वी भकास

ना पडेल पाऊस ना मिळेल अन्नाचा घास

चला करूया मिळून संवर्धन या वृक्षांचे

हेच तर आहेत आधार आपल्या जीवनाचे


Rate this content
Log in