STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
13.4K


येथील प्रत्येक खिडकीत

आहेत किती दबले हुंदके

सुरकुतलेल्या त्या गालांवर

अश्रुंचे ओघळ असे सुके ॥१॥

या चार भिंतीच्या आत

कित्येक आले अन् गेले

प्रत्येकाच्या आयुष्याचे

सदा येथे रितेच प्याले ॥२॥

थकलेले ते शरीर

आत्म्याचेच ओझे

परमात्म्याच्या भेटीस

संपलेले तुझे माझे ॥३॥

जीवाचे रान करून

लेकरांना शिकवले

कळेना पण कसे ?

संस्कार कमी पडले॥४॥

कोणाची मुले परदेशी

कोणी केले बंद दरवाजे

सांभाळायचे कोणी? का?

चेहऱ्यावरच बारा वाजे ॥५॥

वृद्धाश्रम म्हणू नका

माझी मला चीड येते

अनाथालयच हे पण

चिता एकटीच जळते ॥६॥


Rate this content
Log in