वळीव जळवून गेला
वळीव जळवून गेला


तू नसताना हिम्मत केली गं
वळीवानं माझ्या दारात यायची
मला कुठे माहित होते पण,आज
माझी होती तारांबळ उडायची
अंधार आत ,अंधार बाहेर मातला
महावितरणने विचका असा केला
एकुलती बँटरी मिणमिणून रुसली
मेणबत्ती फडताळात अन् फसली
तुला पाऊस आवडत नाही पण
पावसासोबत मला फक्त तूच पुरे
भिजत नसलीस तरी अंतर ओले
तू की पाऊस पाहू भान न उरे..
माहोल होता, परी फोल गं गेला
तुझा दुरावा, वळीव जळवून गेला
ती नसताना यायला कशाला हवे
तिचा आठव कड ओलावून सरला..