विसरु नको मला
विसरु नको मला
1 min
49
मन मनाला जुळलं
प्रेमाचं गणित जमलं
साथ आपली जुळली
आकाश खाली झुकलं
अमेरिकावारी ठरली
पायाखालची भुई सरकली
परतणार कधी राजसा
मनात पाल चुकचुकली
भुलभुलैय्या दुनिया
गुंतते मन मोहजाला
कातर मन विचारते
नाही ना विसरणार तू मला?
खरंच सांगते तुला
केले प्रेम विश्वासून
कितीही लांब गेलास तरी
नाही ना जाणार विसरुन?
साथ तुझी माझी आहे
साथ जन्मजन्मांतरीची
आहे खात्री तुझ्या प्रीतीची
वाट पाहीन तुझ्या परतीची
