विनंती दयाघनापाशी
विनंती दयाघनापाशी


यमा यमा थांबव ना रे तुझं ऑडीट
कोरोनामुळे घरी बसण्याचा आलाय खरंंच वीट
सुबुद्धी दे, निघू दे कोरोनावर औषध लस
नको बघू देवा आमच्या परीक्षेचा कस
गणु बाप्पा आले, गार्हाणं घातले
तेच ते ऐकून गणु बाप्पाचे कान किटले
आली आता मंदीची लाट
संपूर्ण जीवनाचीच लागली वाट
दाणापाणी दुधदुभते खर्च कसा भागवायचा गुंता
चाकरमान्याची वाढत चालली चिंता
उंच उडण्याचे छाटले जात आहेत पंख नाही जोर
झोप उडाली वाढला घोर
होऊ दे चालू रोजगार चाकरी
आनंदाने खायला मिळू दे सगळ्यांना चटणी भाकरी
दयावंत तूू दयाळू, येऊ दे तुला दया
करतोस ना देवा तु आपल्या लेकरावर माया
लाखो अपराध घाल पोटी
लवकर दूूर कर देवा हे संकट चिंता झाली आहे मोठी॥