विद्याधन
विद्याधन
1 min
14.8K
शिक्षणाची आस
असे मज आज
उद्याचे भविष्य
मीच घडवेन
ओढ ती शाळेची.
घरी सरपण
आईस मदत
माझ्याने करीन.
डोईचं ते ओझं
उतरण्या साठी
दप्तर ही माझं
आहे सांभाळलं.
विद्याधन आहे
श्रेष्ठ ते धनात.
सावित्री माईंची
पाईक होईन.
