वेश्या.. एक भटकं जगणं
वेश्या.. एक भटकं जगणं
नारी तारुण्य यौवन
करे आकर्षक जगा
देह मोहाच्या हो पायी
देते लढा आता बघा
परिस्थिती भारी झाली
देह व्यापारात आली
मना ही विटंबना रे !
वेश्या जन्माला आली
भूक वासनेची लत
जागे शैतान मनी
जोर पैसाचा चाले
अब्रू सौदा करे जणी
खाट सरणाची रोज
हसे तोडून लचके
अंग अंग ना हो सोडे
असे मानवी चटके
कष्ट करून राबेन
होते कधी असे म्हणे
मध्ये आडवे हो आले
माझे तारुण्य असणे
बलात्कार पैसाने हो
रोज येथेच घडतो
न्याय निवाडा वंचित
आम्ही वेश्या का जगतो ?
बदनाम म्हणे जगी
रोज जो-तो हिणवतो
पण नसेल हो आम्ही
बलात्कार हो घडतो
आहे सुरक्षित नारी
त्यांची किमती मोजतो
वेश्या म्हणून आम्ही हो
तिळ तिळ या मरतो
