STORYMIRROR

Pradnya Ghodke

Others

3  

Pradnya Ghodke

Others

वेध नजरेत माझ्या

वेध नजरेत माझ्या

1 min
37


हा बाजार कसला?,

हे काय काय सांगती..

माझे चित्त कडेलाच,

जिथे फुलांची वस्ती...! १.


फुलांवर का भाळती,

हिच फुले जी टाळती..

इथे फार गर्दी अन,

नको तेच सोबती.! २.


फार...झाले अता,

एकांत मी गाठते..

मीच माझी सोबती,

तिथे फक्त असते..! ३.


खिडकीत हा पडदा,

मुलायम अन रूपेरी..!

वेध नजरेत माझ्या,

तलम नक्षी सोनेरी...! ४.


गाणे बाहेर मेघांचे,

टपटप ओले थेंब गाती..

अन् त्या सुरांशी माझ्या,

तारा एकांती जुळती..! ५.


Rate this content
Log in