वैशाख वणवा
वैशाख वणवा
1 min
225
भास्कर प्रखर
सारंग उसळे
धरेवर उष्ण
वारे झेपावले (१)
गुलमोहराची
सुमने तोषवी
नीलमनोहर
बहावा खुलवी (२)
शुभ्र मोग-याचा
गंध दरवळे
नव्या नवतीचे
मन आतुरले (३)
वैशाख वणवा
आखितीचा सण
पितरांना कुंभ
ठेवी आठवण (४)
नवेली पालवी
कोकिळ कूजन
वसंत ऋतूत
कोकिळा प्रसन्न (५)
