वाट
वाट

1 min

11.5K
वाट सरता सरेना
पाय जडावून गेले
हात पकड लेकरा
डोई ओझे जडावले
वाटा हिरवळीवरी
रंग सोनेरी हिरवे
डोंगरांच्या कुशीवरी
रंग हिरवे बरवे
नको रेंगाळू रे राजा
जरी निसर्ग फुलला
पाय उचल रे बाबा
नभी मेघ की दाटला
रंग निसर्गाचे जरी
जादू मायावी करती
घाई जायाची रे घरी
मजा दुस-यापरती
बिगी बिगी चल राजा
नभ आता झाकोळले
घर गाठू झणी आता
कसे सांगू मनातले?