वास्तव
वास्तव


इतकं कस तुला समजतं?
माझ्या मनातलं माझ्या आधी उमगतं!!
इतका कसा वेडा होतोस रे तू माझ्या शब्दांसाठी ???
इतका कसा आतुर होतो तू माझ्या भेटीसाठी??
दिवस आणि रात्र असेच निघून जातात
तुझं नावही घेता येत नाही ओठी !!
सगळे काही कळते मला, ही फक्त कल्पना आणि स्वप्नांची कसोटी !!!
प्रत्यक्ष आयुष्यात जबाबदारीची दाटी
ह्याच खऱ्या वास्तवाने भरली माझी ओटी !!