STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

वारी रंगे वारकरी

वारी रंगे वारकरी

1 min
11.9K

पंढरीच्या विठुराया

भक्त सारे तुझ्यासाठी

येती घेऊन पालख्या

ओढ तुला भेटण्याची    (1)


तुळशीवृदांवन शिरी

हाती असे जपमाळ

भेदभाव येथे नाही 

रंगे खरा भक्तीरंग     (2)


रिंगणाचा तो आनंद 

काय शब्दे मी वर्णावा?

सर्व नाचती भक्तीत

मनी विठ्ठलाचा धावा     (5)


संतजनांची महती 

येई नित्य भक्तीपूर

विठ्ठलाच्या भेटीसाठी 

वारकरी हो आतुर     (4)


धन्य तू रे बा विठ्ठला

श्रद्धा भक्तांची ती गाढ

धन्य तुम्ही वारकरी

पायधुळी लागो मज     (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन