वार्धक्य
वार्धक्य

1 min

135
सगळ्यांचं करता करता
हातपाय चालेना
जगलो का
काहीच कळेना
संपली आता
ती ऊर्जा
वार्धक्य बनते
एक सजा
निसर्गाच्या नियमाला
कोण बदलणार
आयुष्य आहे
जगावे लागणार
सुरकुत्यांंनी भरलेला
थकलेला चेहरा
थोडं चाललं
फिरतं गरागरा
नकोसे ते
वाटणारे क्षण
सहन होत
नाही कणकण
नको आपला
कोणास भार
मानवी आता
लागते हार
वाट आता
फक्त शेवटची
सगळं काही
आता संपल्याची