वाजली पैंजणे
वाजली पैंजणे


वाजली पैंजणे अंगणी पावसाची.
दरी ये जा करते, घेते चाहूल लबाड रमनाची
रात गडद होय जशी. मी होते वेडीपिशी.
वाऱ्यावरती लहरत येते, धून बासरीची(१).
तेजाळत वीज हसे. भय उरात दाट तसे.
ओठावर थरथरते साद मोहनाची (२).
थेंबफुले रिमझिमती. श्वास गंध दरवळती.
रात होय जडभारी, नाही साथ त्याची(३).