STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

वा त्रेंबका वा!

वा त्रेंबका वा!

1 min
506


जेष्ठ नागरिक आहे

म्हणूनी दिला तू

की मज मान

थेट सभामंडपी येण्यास!


होईल तुझीच रे

थेट भेट म्हणूनी

होते माझ्याचवर फिदा

तुझे दर्शन घेण्यास!


चालुनी मी भरभर

चढत होते पायर्या

पुजाऱ्यांच्या गराड्यातून सुटून

गाठले तुझे सभामंडप!


सभोताली होती की

ही भली मोठी

भक्तांची पुजेचे साहित्य

हातात घेवुनी रांग!


शांतपणे नाम

तुझे घेउनी व्हायचे

होते तुझ्या चरणी

मज नतमस्तक छान!


पण ना रमले

मी तुझ्या सभामंडपी

लक्ष्य सारे माझे

बाहेर उभ्या सग्यासोयरात!


ना घेता आले

तुझे सभामंडपी जाऊनही

शांत राहुनी दर्शन

वा त्रेंबका वा!


का केला मी

एवढा आटापीटा मनाचा

तुझ्या दारी येऊन

नाही झाली गाठभेट!


घरी मी असता

शांत मनाने सतत

दंग असते तुझे

नामस्मरण करण्या मनात!


Rate this content
Log in