ऊन पाऊस
ऊन पाऊस
1 min
201
येता ऋतू पावसाळा
ढग गर्जती जोरात
दिव्य विजा चमकती
सारा गोंधळ लोकांत
रिमझिम पावसाच्या
मस्त झरझर धारा
थेंब टपकती पर्णी
ताल सावरतो वारा
काव्य स्मरते कविला
मिळे व्वा व्वा रचनेला
नाते कवी पावसाचे
अलौकिक कवितेला
हिरवळ दाटे सारी
नववधू वसुंधरा
सृष्टी सौदर्य खुलवी
ऋतूरंग पहा बरा
लगबग चाले शेता
करी बळी नांगरणी
सर्जा संगे त्या शिवारी
मस्त उत्साही पेरणी
श्रावणात सप्तरंगी
दिसे कमान आकाशी
प्रेमी युगल पाहता
हर्ष भरे हृदयाशी
नदी नाले ते भरती
झरझर ते वाहती
सकलांना सौख्य देती
अंती सागरा मिळती