STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

तू पाहता नव्याने

तू पाहता नव्याने

1 min
57

प्राक्तनात माझ्या देहाच्या, असशील तू वा नसशील

उमलतात माझ्या हृदयपाकळ्या, मज तू पाहता नव्याने


बहाण्यांवर तुझ्या असला, जरी माझा रुसवा

क्षणात एका मी खुलतो, मज तू पाहता नव्याने


तू समोर नसता वितुष्ट होऊन बसतो मी एकांती

अन आनंदतो त्या एकांतातही, मज तू पाहता नव्याने


असतो क्षणिक तुझ्यावरला, तो राग माझा लटका

उसळतो प्रीतसागर मनी माझ्या, मज तू पाहता नव्याने


सरी सांडती अखंड तरी, तो निसर्ग उगा रुसतो

अन आपोआप तो फुलतो, मज तू पाहता नव्याने


शोधत जुन्या वाटी तुजला, कधी एकटाच मी फिरतो

स्वर्गसुख अनुभवतो मी, मज तू पाहता नव्याने


या आयुष्याचे स्वप्न माझ्या, तुझ्यास्तव मी पाहिले

ते स्वप्न माझे पूर्ण होते, मज तू पाहता नव्याने


नजरेतली कट्यार तुझ्या जरी घायाळ करते मला 

जन्मतो मी पुन्हा पुन्हा, मज तू पाहता नव्याने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance