तू हसताना
तू हसताना


तू हसताना वाटे जणू
गुलाबाला कळी फुलली
रात्रीच्या अंधारात
चंद्राने चांदणीला मिठी मारली
तू हसताना तुझ्या
चेहऱ्यावर उतरते लाली
हळूच टिपली जाते
तुझ्या गालावरची खळी
तू हसताना दुःख
सारे विसरायला होते
परत नव्याने उभा
राहण्याची उमेद मिळते