Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

तुला कसं जमतं ग ?

तुला कसं जमतं ग ?

1 min
7.0K


खरंच सांग ,तुला कसं जमतं ग ? 

सर्वस्व अर्पून घराला घरपण देणं ...

मन मारून जगणं , दुःख उदरात दडवून 

खोटं-खोटं हसणं, सदैव आंनदी भासवण


खरंच सांग तुला कसं जमतं ग ? 

परिस्थितीशी दोन हात करणं... 

मनाला नाही पटलं तरी

आनंदानं सर्वकाही स्वीकारणं ...


खरंच सांग तुला कसं जमतं ग ? 

ओठात एक , मनात काहीतरी वेगळंच ...

इच्छा-आकांक्षाना , भावनांना मुरड घालणं 

अन संगणकासारखं केवळ आदेश पाळणं ?


खरंच सांग तुला कसं जमतं ग ? 

सराईतपणे घरचं - दारच करताना ... 

दमछाक होते तरी.. कुरबुर न करता 

पुरून उरतेस कशी ? सगळ्याची मर्जी राखताना ..


खरंच सांग गडे! तुला कसं जमतं ग ?

खोल सारे गुपित मनीचे ,दे मला धडे सहनशीलतेची 

सांग ना गडे! एकाचवेळी इतकी पात्र तू कशी निभावतेस ?

मैत्रीण तर कधी अर्धांगिनी बनून.दोन्ही आघाड्यावर लढतेस ...


Rate this content
Log in