तुज्या डोळ्यात
तुज्या डोळ्यात
1 min
2.8K
तुज्या सहवासात घालवलेले मोहक क्षण
मला एकदाच तुज्या डोळ्यात बगायचंय
आपल्या दोघांची ती पहिली भेट
तू केसात माळलेल्या गुलाबाचा देठ
मला एकदाच तुज्या डोळ्यात बगायचंय
आपल्या दोघांचं तासनतास बोलणं
विषय संपलेला असतानाही उगाचच रटाळ भांडण
मला एकदाच तुज्या डोळ्यात बगायचंय
तुज अलगद लाजून हसन
अनं हसून मला पाहण
मला एकदाच तुज्या डोळ्यात बगायचंय

