तुझी चाहूल
तुझी चाहूल


तुझ्या येण्याची चाहूल
मनाला हिरवीशी भूल
वय सांडूनि बाजूला
बाहेर डोकावते मूल
तुझा स्पर्श पहिला तो
होतो कोमल ओंजळीला
तनामनात मृदगंध भरे
हवे काय मग वेडीला..?
वळीवाचे रुप फक्त भास
सखा मोसमी हवा खास
वळीव लुटतो क्षणात पण
तू सोबतीला चारही मास.
तुला भरून घेते ह्रदयात
मग चिंता कसली उन्हात
तुझी ओलेती आठवण
उरते-पुरते माझ्या मनात.