STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

टिल्लू

टिल्लू

1 min
13K


बाबांनी आणले

मांजरीचे पिल्लू.

सारेजण त्याला

म्हणती हं टिल्लू.


डोळे तिचे घारे

मऊ मऊ अंग.

तोंडावर मिशा

सोनेरीच रंग.


दूध नि उंदीर

टिल्लू करी फस्त.

झोपी जाते मग

आरामात मस्त.


दादा,ताई तिला

चिडवती फार.

उंदीर घेऊनि

होतात पसार.


टिल्लूही चिडते

करी म्याव म्याव.

थकुनिया घेते

माझ्याकडे धाव.


साहित्याला गुण द्या
लॉग इन