तरंग ( सहाक्षरी )
तरंग ( सहाक्षरी )

1 min

11.4K
जलात उठती
अनेक तरंग
भासती खरेच
तीच रंगारंग
पाण्याचा तो थेंब
एकच पडतो
अनेक वर्तुळ
जळी उठवतो
अशांत मनाला
शांत ते करण्या
निरव शांतता
बघावी राखण्या
थेंब हे पाण्याचे
पाण्यातच पडे
सांगा मग पुढे
त्याचे काय घडे ?