Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Inspirational

4.0  

kishor zote

Inspirational

तो बुद्ध मी (अभंग रचना)

तो बुद्ध मी (अभंग रचना)

1 min
35


जमीनीत याच । गाडून राहीलो ।

पुन्हा उगवलो । धम्म रूपे ।। १ ॥


जम्बुव्दिप आज । भारत जाहले ।

पिंपळ राहीले । चैतन्यात ॥ २ ॥


विहार लेण्यात । तोडफोड किती ? ।

शेंदूर फासती । ढोंगीपणे ॥ ३ ॥


देवस्थान सारे । श्रीमंत जाहले ।

पिठ रेघोटले । ते ऐतेच ॥ ४ ॥


न्यायाच्या संस्थेत । निवाडाच झाला ।

न्याय ना जाहला । तराजूत ॥ ५ ॥


मंदिर बांधण्या। खोद काम करी ।

आलो तेथे वरी । तो बुद्ध मी ॥ ६ ॥


Rate this content
Log in