Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तिची कविता

तिची कविता

1 min
158

लडिवाळ पैंजण घालून

प्रतिभेचे आगमन

उंचबळून येते तिचे मन

खुलते मनप्रांगण

घड्याळाचा कर्कश गजर

बंद करावा लागतो

डब्याचा बेत दिसू लागतो

चहा ठेवावा लागतो

कधी गाडी चालवतानाही

सुचतात काही ओळी

सखी मनोमनी सुखावते

लिहीन फावल्या वेळी

मस्टर आँफिस काम बाँस

 तालात नाचवतात

दूध भाजी खरेदी करता

 नाकी नऊ येतात

कडक चहा प्यायल्यावर

सगळा शीण जातो

पेन वही पुढ्यात घेऊन

शब्द शब्द उमटतो

आता झकास मूड जमलेला

शब्दमेळ खुललेला

ती असते शब्दप्रांगणी

शेवट हाती आलेला

तोच नवरा मुले येतात

फर्माईश करतात

हसून होकार देते सखी

किचनच्या प्रांगणात

सर्व आटपून झाल्यावर

पुन्हा एकदा साधना

पूर्वीसारखे न सुचल्याने

अपूर्ण मनोकामना

बाई कविता करते म्हणजे

सर्व व्याप सांभाळून

रुसली कधी प्रतिभा तरी

हळुवार कुरवाळून

Rate this content
Log in