थांब रे आता पाऊसा
थांब रे आता पाऊसा

1 min

11.7K
थांब रे आता पाऊसा
जरा तरी घे उसासा
अक्राळविक्राळ रुप
घेऊनीया आला कसा!! (1)
कर्मचारी नि विद्यार्थी
खूप आता थकले रे
रस्त्यावरी चहूकडे
पाणीच पाणी झाले रे (2)
वेगवान तुझा मारा
अफाटचि अचाटचि
घरी परतणारे गेले
देवाघरी अघटितचि (3)
कृषीवल हो चिंतित
ओला दुष्काळचि आला
काय जलमय माया
धारा लागती डोळ्यांना (4)
आता नको हस्तालागी
पिसाटल्यापरि येऊ
आता येई मृगालागी
तेव्हा स्वागतचि करु (5)