STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

तेंव्हा कुठे...

तेंव्हा कुठे...

1 min
13.9K


बळीराजा - बळी्राजा सा-यानी मिळुनी तुझा वा्जविला की  बाजा

या भामट्यांच्यामुळे नाह्क तुझ्या जगण्याचा  झाला की रं तमाशा

तुझ्या मरणाचंही त्यांनी भांड्वल केलं... घरच्या - दारच्यांनीही  अंतरबाह्य पोख्ररलं

सरकार, निसर्ग , व्यापारी सगळ्यांनीच जगणं तुझं मुश्किल केलं...

 

तुझ्याशिवाय जिणं त्यांच अ्शक्य अ्सलं तरी त्यांच्यालेखी किंमत तुझी शून्य आहे

कामापुरता मामा अनं  दुधापुरती आई हाच इथला रिवाज आहे...

जगाचा पोशींदा असला तरी तुच आज असहाय्य अनं  कफल्लक झालास...

आदर्शांच गाठोडं सगळ्यांनी सोड्लंय तू  मात्र संस्कारी तसाच,  व्यवहारी जगात  वेडाच ठरलास, 

 

तुझ्या अन्नावर पोसणारी पिढी  कृतघ्न निघाली , सहानुभूती तर सोडाचं 

उलट विरोधी गरळ  ओकत आहे चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नाहीच मित्रा

अंत  नका पाहू गड्यांनो !  बळीराजाचा आता , आ्पसूकचं रुम्हणं  त्याच्या हाती येईल

तेंव्हा कुठे  भामट्याची पळता भूई थोडी होईल... पुन्हा बळीराजाचं राज्य येईल...


Rate this content
Log in