ते शब्दही माझे नसती..
ते शब्दही माझे नसती..


रचली जरी थोर काव्ये,
त्या रचना माझ्या नसती..!
गाईल्या किती गोड ओव्या,
त्या ओव्या माझ्या नसती..!
सुचली बहु जरी कथा नाट्ये..
ते सुचव माझा नसती..!
आठवली जरी लेख-निबंधे..
ते आठव माझा नसती..!
आले जरी ते मम ओठी,
ते शब्दही माझे नसती..!
वसती अंतरी जरी ते माझ्या,
ते हृदय माझे नसती..!
लिहिले किती जरी काही,
ती कागदे माझे नसती..!
ना लेखणी माझी असती,
ना ती शाई माझी असती..!
ना हातही माझे असते,
ना ते शरीरही माझे असते..!
आणि हे सर्व लिहितांना,
मी सुद्धा माझा नसे तो..!
शब्दांची जननी असे ती,
माय विद्या सरस्वती..!
जिथे जिथे तिची वसती
तिथेच नांदे श्री गणपती..!
मिळता आशीर्वाद तयांचा,
दुःखे ही सारे हरती..!
ठेविता मस्तक तया चरणी,
ज्ञानसागरी सर्व तरती..!
विद्या विनयेन शोभते,
जगी कुणी ना उगीच म्हणती..!
थोर कवी ऋषीमुनी ही,
शरण तयांना च जाती..!
गुंफूनी महा शब्द सुमने,
काव्य माला प्रेमे अर्पिती..!
रचिली त्यांनी महाकाव्ये,
म्हणुनी जगी असे ख्याती..!
विनम्र होऊनी तयांना,
जुळविता शब्दांची नाती..!
सुर ताल लया सहित,
कथा काव्ये ही मग स्फूरती..!