स्वप्नातली परी
स्वप्नातली परी
1 min
943
स्वप्नातली ती परी हरवली कुठेतरी आज
पण मन मात्र होत नाही निराश
कुठूनतरी येईल ती एवढीच त्याला आस
लहान असताना किती बरं होतं
सगळं कसं अगदी साधं होतं
काहीही झालं तरी एक आशा होती
कारण ती परी नेहमीच सोबत होती
पण आता मोठं झालो म्हणून काय झालं
परी नसली तरी तिच्या जादूच रहस्य आम्ही शोधलं
कशाचीच मुळी भिती वाटत नाही आता
नकाराच्या प्रवासातही शोधतो आम्ही होकारच्या वाटा
एक दिवस मग नक्की सापडेल ती परी
कारण दडलेली आहे ती आपल्याच कुठेतरी
