वेळ
वेळ
1 min
558
जरासा उशीर काय झाला
सगळं गणितच विसकटलं
ऊन जरा जास्तच रागावलं
त्याच्या तडाख्याने उमललेलं
नवकोर उमेदीचं फूल अगदी कोमेजून गेल
प्रवास सुरुच राहिला
कारण सिग्नल अजूनही green होता
कुठेतरी अंतर मिटेल याचसाठी वेडा जीव झुरत होता
वाट पहात होतं कुणीतरी घरी
म्हणून तगमग ही वाढली
"Sorry, अरे आजही बस चुकली..."
या वाक्यानंतरच्या तुझ्या त्या लटक्या रागासाठी
मी माझी वेळ कधीच नाही पाळली।
