जरासं थांबणं विसरलो..
जरासं थांबणं विसरलो..
1 min
808
या जगात धावता धावता
जरासं थांबणं विसरलो...
आकाशाला गवसणी घालता घालता
पायाखालच्या त्या जमिनीच अस्तित्व विसरलो...
पिझ्झा , बर्गर चाखता चाखता
आईच्या हातची चव विसरलो...
सगळ्यांवर प्रेम करता करता
प्रेम या शब्दाचा खरा अर्थ विसरलो...
माणसांच्या गर्दीत धावता धावता
माणसातला माणूस विसरलो...
शाळेतली गणितं सोडवता सोडवता
आयुष्यातले हातचे विसरलो...
या जगात धावता धावता
जरासं थांबणं विसरलो...
